esakal | रणजित सफेलकरवर आणखी एक खंडणीचा गुन्हा; ५० लाखांची मागणी; दीड कोटींचे दुकान हडपले

बोलून बातमी शोधा

तक्रारदार डुमन श्रावण प्रकट(५१, भीलगाव, जुनी वस्ती) यांच्या मालकीचे खैरी खडगाव येथे सहा रूम आणि समोर थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेवर कुख्यात रणजित सफेलकर याची नजर गेली.

तक्रारदार डुमन श्रावण प्रकट(५१, भीलगाव, जुनी वस्ती) यांच्या मालकीचे खैरी खडगाव येथे सहा रूम आणि समोर थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेवर कुख्यात रणजित सफेलकर याची नजर गेली.

रणजित सफेलकरवर आणखी एक खंडणीचा गुन्हा; ५० लाखांची मागणी; दीड कोटींचे दुकान हडपले
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः एकनाथ निमगडे आणि मनिष श्रीवास हत्याकांचा मास्टरमाईंड कुख्यात रणजित सफेलकरवर आणखी एक खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला. कालू हाटे, भरत हाटे यांच्या मदतीने एका व्यक्तीचे दीड कोटींचे दुकान हडपले तसेच ५० लाखांची खंडणी मागितली.

'आता खऱ्या अर्थानं चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल'; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर...

तक्रारदार डुमन श्रावण प्रकट(५१, भीलगाव, जुनी वस्ती) यांच्या मालकीचे खैरी खडगाव येथे सहा रूम आणि समोर थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेवर कुख्यात रणजित सफेलकर याची नजर गेली. त्या जागेवर सफेलकरला कब्जा मारायचा होता. त्याने कालू हाटे, भरत हाटे, जितेंद्र कटारिया, विनित अण्णा आणि त्यांचे अन्य साथिदारांना प्रकट यांच्या दुकानावर कब्जा मारण्यास सांगितले. त्यांनी प्रकट यांची भेट घेतली. १० ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकट यांचे सहा रूमचे दुकान भाड्याने घेण्याचा बनाव केला. दुकानाचे भाडे म्हणून ठरले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रणजित सफेलकरने तेथे आपले कार्यालय बनवले. 

तेथे नेहमी हाटे बंधूंच्या गुंडांचा जमावडा राहत होता. वर्षभरानंतर ५ लाख २० हजार रूपये भाड्याचे मागायला गेले असता प्रकट यांच्या डोक्याला रणजितने पिस्तूल लावली. ‘जान प्यारी हैं या दुकान’ अशी धमकी दिली. त्यानंतर प्रकट यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाख रूपयांची खंडणी मागितली. जीवाच्या भीतीने प्रकट यांनी १० लाखांची खंडणी दिली. 

नागपुरात का फुगतोय कोरोनाचा आकडा? धक्कादायक माहिती आली समोर; चूक नेमकी कोणाची? 

काही दिवसांनी सफेलकरने दुकानाच्या वर असलेले चार खोल्यांच्या घरावरही कब्जा केला होता. सफेलकर श्रीवास हत्याकांडात अटक होताच प्रकट यांनी गुन्हे शाखेत डीसीपी गजानन शिवलिंग राजमाने यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी सफेलकर, कालू हाटे, भरत हाटे यांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ