गोळीबाराच्या घटनेनं हादरलं नागपूर, CCTV फुटेज आलं समोर

Crime
CrimeSakal
Updated on

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (nagpur crime) घटनांमध्ये वाढ होत आहे. आज सोमवारी देखील गोळीबाराच्या घटनेनं (firing incident nagpur) नागपूर हादरलं. पहाटे 5 वाजताच्या दरम्यान गीतांजली टॉकीज चौकात ही गोळीबाराची घटना घडलीय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

Crime
VIDEO : आदिवासी समाजाच्या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ केली जातेय का?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हे मौसीनचा पाठलाग करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हे मौसीनचा पाठलाग करत आहेत.e sakal

मौसीन खान या गुंडावर प्रतिस्पर्धी टोळीच्या चार आरोपींनी गोळीबार केला. एका व्हॅन मधून हे आरोपी आले होते. पाठलाग करत आरोपींनी मौसीन खान याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी मौसीन खान याच्या मांडीत घुसली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. वस्तीतील वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार केल्याची चर्चा आहे.

नागपुरात वारंवार खुनाच्या घटना घडत आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर तर शहरात एकच खळबळ उडाली आहे. वारंवार घटना घडत असून सुद्धा पोलिस काहीच करत नाहीत का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. शहरात खरंच पोलिसांचा धाक राहिलाय का? असा प्रश्न निर्माण झालाय. घटनेचा पुढील तपास नागपूर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com