

Nagpur News
esakal
नागपूर: शहर सायबर पोलिस ठाण्याने क्रिकेट बेटिंगच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला आहे. याप्रकरणी एका किराणा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात ४२ जणांची बँक खाती तात्काळ गोठविली आहेत. सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने पुणे आणि मुंबईत एकाचवेळी छापे टाकले असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे.