esakal | केवळ चार बिबट, एक वाघ अन् निलगायीला पालकत्व, मोहिमेला प्रतिसादच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

केवळ चार बिबट, एक वाघ अन् निलगायीला पालकत्व, मोहिमेला प्रतिसादच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (coronavirus) सर्वत्र जग थांबलेले असताना वन्यप्राणी दत्तक योजनेलाही (wildlife adoption scheme) त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात गोरेवाडा (gorewada international zoo) आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील (maharajbag zoo) वन्यप्राण्यांचे पालकत्व घेतलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. गोरेवाड्यातील एक वाघ आणि चार बिबट आणि महाराजबागेतील बिबट आणि निलगायीला पालकत्व‍ मिळाले आहे. (only four leopard, one tiger and nilgai adopot from gorewada international zoo)

हेही वाचा: International Tiger Day 2021 : वाघ खरंच 'नरभक्षी' असतो का?

वन्यजीव पालकत्व योजना केंद्राने सुरू केल्यानंतर आसाम व झारखंडमधील प्राणिसंग्रहालयाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या राज्यातल्या प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेक ‘सेलिब्रिटी’ समोर आले. तसेच महाराजबागमधील वाघाचे पालकत्व टायगर श्रॉफने घेतले होते. साहेबराव वाघाचे पालकत्व डॉ. सुश्रुत बाभूळकर यांनी घेतले होते. त्या वाघाचे बोटे बहेलिया शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकल्याने तोडावे लागले होते. त्या वाघाच्या पायाचे तुटलेली बोटे पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,. तो अपयशी ठरला. असे भाग्य घेऊन आलेल्या साहेबराव सध्या पालकाविना आहे.

कधीकाळी मध्य भारतातील वन्यजीवप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातही तीन वर्षांपूर्वी या योजनेला सुरुवात झाली. एका अनिवासी भारतीयाने या प्राणिसंग्रहालयातील वाघाचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफने ‘ली’ वाघिणीचे पालकत्व दोन वर्षांपूर्वी स्वीकारले. पालकत्वाची मुदत संपल्यानंतर या दोघांपैकी कुणीही महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे ढुंकून पाहिले नाही किंवा प्राणिसंग्रहालय प्रशासनाशी संपर्क साधला नाही. नीलगाय आणि बिबट्याचे पालकत्व एका शाळेने आणि एका महिलेने घेतलेले आहे. महाराजबागेतील दत्तक योजनेला कोरोनाचा संसर्ग लागल्याने वाघासह सर्वच पाणी अनाथ आहेत.

इतर राज्यात चित्रपट, क्रिकेट क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ वन्यप्राणी दत्तक घेण्यासाठी समोर येत आहे. विदर्भातील ही योजना अल्पशा प्रतिसादावर तग धरून आहे. या योजनेवरून आता महाराजबाग आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात स्पर्धा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

गोरेवाडा प्रकल्प -

वाघ - १२

बिबट - २८

अस्वल - १०

महाराजबाग -

वाघ - २

बिबट - ४

अस्वल - ४

नीलगाय - १५

loading image
go to top