
'ऑपरेशन सिंधूर' नंतर भारतीय सैन्याच्या विरोधात सोशल मीडियावर गरळ ओकणाऱ्या 26 वर्षीय नक्षल समर्थक तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. रेझाम माडेपट्टी शिबा सिदीकी असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा केरळ येथील आहे. त्याला नागपूरमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.