u-turn accident
sakal
नागपूर - पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभागाकडून शहरात ऑपरेशन यू-टर्न’ राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे शहरातील अपघात आणि अपघाती मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपघात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या यंदा ८१ ने घटली असल्याचे त्यांनी सांगितले.