
नागपूर : शपथविधी होऊनही अद्याप मंत्र्यांना खाती नाहीत. गेल्या पाच दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, शेतकरी इत्यादी विषयांवर विरोधक चर्चा करीत आहोत. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार असूनही नसल्यासारखे आहे कारण राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत केला.