esakal | OBC आरक्षण न्यायालयात टिकेल, फडणवीसांचा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

OBC आरक्षण न्यायालयात टिकेल, फडणवीसांचा विश्वास

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Oppositon leader Devendra fadnavis) यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यामध्ये काय चर्चा झाली? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बैठक कुठल्याही राजकीय चर्चेसाठी नव्हती. ओबीसींना आरक्षणासंबंधी (OBC Reservation) ही बैठक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: OBC च्या इम्पेरिकल डेटावरुन अशोक चव्हाणांची मोदी सरकारवर टीका

केवळ ओबीसी आरक्षणासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती. यावेळी उपमुख्यमंत्री आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षही होते. ओबीसी आरक्षण पुन्हा कसं देता येईल, याबाबत मी चर्चा केली. माझ्या काही सूचना होत्या, त्या सूचना मी त्यांना दिल्या. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण अतिरिक्त ठरवत रद्द केले होते. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या. मात्र, न्यायालयाने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा कऱण्यास सांगितले. त्यानुसार राज्यात मागासवर्गीय आयोगही बसविण्यात आला. तरीही इम्पिरिकल डेटा गोळा झाला नाही. त्यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढला. त्यानंतर काल राज्यपालांनी त्यावर सही केली. पण, या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्याची भीती देखील आहे. पण, हा अध्यादेश न्यायालयात टिकणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

loading image
go to top