
नागपूर : प्रादेशिक हवामान विभागातर्फे शुक्रवारी विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र ऑरेंज अलर्ट असूनही शहरात मुसळधार बरसलाच नाही. मोजक्याच भागांमध्ये दुपारी हलका शिडकावा झाला. त्यामुळे हवामान विभागाचा हा इशारा नेहमीप्रमाणे फोल ठरला आहे. शनिवारीही नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.