Orphaned baby girl : चिमुकल्या ‘किमया’ ला मिळाले हक्काचे घर...उपराजधानीतील अनाथालयात मिळाला आसरा, अन् झाले नामकरण
Orphaned girl Nakoshi receives new life and name Kimaya : जन्मतःच अनाथ झालेल्या चिमुकलीला ‘नकोशी’ म्हणून ओळखले जात होते, पण तिच्या नवीन जीवनाची सुरूवात ‘किमया’ म्हणून झाली. सरकारी यंत्रणांच्या मदतीने तिला अनाथालयात हक्काचे घर मिळाले.
नागपूर : तिच्या माथ्यावर जन्मतः ‘नकोशी’ असा शिक्का मारला गेला. महिनाभर उपचारासाठी नकोशी चिमुकली मेडिकलच्या वॉर्डात दाखल होती. वॉर्डातील साऱ्या परिचारिका नकोशीच्या आई बनल्या होत्या.