
नागपूर : ‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हेत, तर संपूर्ण ‘विश्व’. तर काटेरी वाटेवरून चालत मुलांच्या आयुष्याला आकार देणारा ‘बाप’. मात्र येथे तर आईबापच नुकत्याच जन्माला आलेल्या लेकीचे वैरी ठरले. कोवळ्या निरागस जिवाला जगण्यासाठी मायेची ऊब देण्याऐवजी मेडिकलच्या खाटेवर सोडून आईबापाने पलायन केले. जन्मतः दुधापासून ती वंचित राहिलेल्या नकोशीला जगवण्यासाठी वत्सलतेने येथील परिचारिका ‘आई’चा धर्म निभावत आहेत.