esakal | विद्यापीठात बाहेरील व्यक्तींना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी, कुणी घेतला हा निर्णय?
sakal

बोलून बातमी शोधा

Outsiders banned from entering the Nagpur university till August 31

शासनाच्या आदेशानुसार आवश्यक कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात बोलवावे. याशिवाय विभाग व कार्यालयात कोणत्याही अभ्यागतांना भेटीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत बोलवण्यात येऊ नये. जर कुणीही अभ्यागत भेटीकरिता आल्यास त्यांना स्पष्ट मनाई करण्यात यावी.

विद्यापीठात बाहेरील व्यक्तींना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी, कुणी घेतला हा निर्णय?

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर  : उपराजधानीत कोरोनाचा वाढता प्रभाव बघता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ३१ ऑगस्टपर्यंत विद्यापीठात कार्यालयातील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांच्या प्रवेशासाठी मनाई केली आहे. यासंबंधीचे पत्र विद्यापीठाने जाहीर केले आहे. मात्र, देशभरातच कोरोनाचा प्रकोप असताना कुणीही शिष्टमंडळ व प्राधिकरण सदस्यांवर अशी बंदी घातली नसता नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचा काही सदस्यांकडून विरोध होत आहे.

महत्त्वाची बातमी - ठाकरे सरकार हिंमत असेल तर माजी आमदारांवर ही कारवाई करून दाखवा...
 

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार आवश्यक कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात बोलवावे. याशिवाय विभाग व कार्यालयात कोणत्याही अभ्यागतांना भेटीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत बोलवण्यात येऊ नये. जर कुणीही अभ्यागत भेटीकरिता आल्यास त्यांना स्पष्ट मनाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयातील प्रवेशद्वारावरून फक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनाच प्रवेश देण्याचे व याशिवाय कुणालाही कार्यालयात प्रवेश न देण्याचे आपल्या विभागातील सुरक्षा रक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव म्हणून विद्यापीठाने ही खबरदारी घेतील आहे. मात्र, कुलगुरूंच्या या निर्णयाला प्राधिकरण सदस्यांकडून विरोध होत आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण देशावरच आहे. असे असतानाही राज्यपालांपासून ते कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारचे पत्र काढून भेटण्यास मज्जाव केलेला नाही. असे असतानाही केवळ नागपूर विद्यापीठाने अशाप्रकारचे पत्र काढल्याने विरोध होत आहे.

कुलगुरूंनी काढलेले पत्र निंदनीय
कुलगुरूंनी काढलेले पत्र निंदनीय आहे. मुख्यमंत्री व राज्यपालांनीही लोकप्रतिनिधींनी भेटू नये किंवा निवेदन देण्यास येऊ नये, असे प्रतिबंध घातले नाही. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी तसे केलेले नाही. मात्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी रूजू होताच असे परिपत्रक काढून प्रशासकीय कामातील आंधळेपणा स्पष्ट केला आहे.
-डॉ. केशव मेंढे, अधिसभा सदस्य 

संपादन : अतुल मांगे

loading image
go to top