Nagpur Child : उपराजधानीत दरमहा १०० बालकांचा मृत्यू; ८ महिन्यांत दगावली ७९९ मुले, प्रशासकीय अनास्था कारणीभूत
Child Mortality Rate : नागपूरमध्ये ८ महिन्यांत ७९९ बालकांचा मृत्यू झाला आहे, यामुळे बालमृत्यू कमी करण्यासाठी असलेल्या योजनांची अपयश स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे हे दुःखद प्रसंग घडले असल्याची चर्चा आहे.
नागपूर : योजना कितीही चांगली असली तरी योग्य अंमलबजावणी अभावी ती अपयशी ठरते. हिच स्थिती राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेची झाली आहे. बालमृत्यू कमी करण्यासाठी शासनाने वारेमाप योजनांचा सुरू केल्या.