Nagpur Health Crisis : मेडिकलमध्ये केवळ पाच निओनेटल व्हेंटिलेटर; पूर्व विदर्भात वर्षभरात दगावले २३३९ शिशू
Nagpur News : पूर्व विदर्भातील सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात शिशूंना आवश्यक असलेल्या निओनेटल व्हेंटिलेटरची भीषण कमतरता असून दरवर्षी २३३९ शिशू मृत्यूमुखी पडतात. आरोग्य व्यवस्थेतील ही दयनीय स्थिती निष्काळजी धोरणाचे फलित आहे.
नागपूर : नवजात शिशू तसेच बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध योजनांचा पाऊस पाडला शासनाकडून पाडला जातो, मात्र नागपूरसह पूर्व विदर्भात दरवर्षी दोन ते अडीच हजारावर मृत्यू होत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.