काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस

काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस
Pix_Pratik

नागपूर : कोरोनाविरोधात लढ्यात आघाडीवर राहून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाधितांची सेवा करणारे आरोग्यसेवक (Health Workers) व फ्रंटलाइन कर्मचारी (Frontline Workers), अधिकारी लसीच्या दुसऱ्या डोजपासून (Second dose of Vaccine) वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. पाहिला डोस घेणाऱ्यांपैकी केवळ चाळीस टक्क्यांपेक्षाही कमी आरोग्यसेवक व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लसीचा दुसरा डोज मिळाला. या कोरोना योद्ध्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणीच महापालिकेने फेटाळून लावल्याचे चित्र आहे. (over 40 percent health workers did not get vaccine yet)

काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस
लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस

आरोग्यसेवकांना १६ जानेवारीपासून सूरू झालेल्या पहिल्या टप्प्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. शहरात २४ हजार ५०० आरोग्यसेवकांची नोंदणी पहिल्या टप्प्यात करण्यात आली होती. शहरात सुरवातीला पाच लसीकरण केंद्र होते. प्रत्येकी १०० या प्रमाणे दररोज ५०० आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात येणार होते. त्यानंतर लसीकरण केंद्राची संख्याही वाढली. मात्र दररोज पाच केंद्रावर प्रथम नोंदणी झालेल्या आरोग्यसेवकांना दीड महिन्यात पहिला डोज घेणे अपेक्षित होते. त्यांनतर दीड महिन्यात प्रथम नोंदणी झालेल्यांना २४ हजार ५०० आरोग्यसेवकांना दुसरा डोज अपेक्षित होता.

अर्थात साडेचोवीस हजार आरोग्यसेवकांचे दोन्ही डोज मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु ७ मेपर्यंत २१ हजार १३७ आरोग्यसेवकांनीच दुसरा डोज घेतला. त्यामुळे १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील आरोग्यसेवकांनी अद्याप दुसरा डोज घेतला नसल्याचे दिसून येते. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला. केंद्र वाढले अन पहिला डोस घेतलेल्या आरोग्यसेवकांची संख्याही वाढली. ७ मेपर्यंत ४३ हजार ९६५ आरोग्यसेवकांनी पहिला डोज घेतला. यातील २१ हजार १३७ जणांनी दुसरा डोज घेतला. ही टक्केवारी ४८ असून ५२ टक्के आरोग्यसेवक दुसऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

हीच बाब फ्रंटलाइन कर्मचारी व अधिकाऱ्यांबाबत दिसून येत आहे. आतापर्यंत ४८ हजार ९१५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी पाहिला डोज घेतला असून यापैकी केवळ १४ हजार ९२ जणांनी दुसरा डोज घेतला. दोन्ही डोस घेणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची टक्केवारी ३० पेक्षाही कमी असून ७० टक्क्यांवर कर्मचारी दुसऱ्या डोजपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे आरोग्यसेवक व फ्रंटलाइन कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोना काळात ड्यूटीवरही जावे लागते, त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त करीत तशी मागणीही मनपातील कर्मचारी संघटनेने केली होती.

काय सांगता! तब्बल ४० टक्के कोरोना योद्ध्यांनाही अजून मिळाली नाही लस
यवतमाळकरांनो, आजपासून कडक निर्बंध लागू; वाचा काय राहणार सुरु आणि काय बंद

परंतु त्यांनतर ४५ ते ६० व ६० वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले, यात लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे अनेक आरोग्यसेवक व फ्रंटलाइन कर्मचारी दुसऱ्या डोजपासून वंचित असल्याचे सूत्राने नमूद केले. मनपातील राष्ट्रीय म्युनिसिपल एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांनी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

(over 40 percent health workers did not get vaccine yet)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com