

Food Poisoning Scare at Laheri Government Ashram School
Sakal
भामरागड (जि. गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवार (ता. २८) सकाळी जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ७० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.