

Nagpur News
esakal
नागपूर: गुरुवारी पहाटे शहराच्या दोन टोकांवर भीषण आग लागून लाखोंची मालमत्ता जळून राख झाली. पारडी परिसरातील कापसी खुर्द येथील अगरबत्ती कंपनीत लागलेल्या आगीत तब्बल ५० लाखांचे साहित्य जळून खाक झाले, तर फेटरी परिसरातील प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला आगीने विळखा घातल्याने एकच खळबळ उडाली.