ट्रॅकवर खड्डा पडल्याने दक्षिण एक्सप्रेसचा डब्बा उसळला, सुदैवाने दुर्घटना टळली

 railway station
railway statione sakal
Updated on

नागपूर : रेल्वे रूळाखाली अचानक मोठा खड्डा (pathole on railway track) पडला. त्यावरून धडधडत जाणाऱ्या रेल्वेगाडीचा डब्बा चांगलाच उसळला. याप्रकाराने डबा रुळावरून उसळण्याचा धोका होता. सुदैवाने दुर्घटना टळली. नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. (pathole on railway track in nagpur railway station)

 railway station
ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय लॉक; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

इटारसी एण्डकडून नागपूर रेल्वे स्थानकाला छेदणारा मोठा नाला वाहतो. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी उपयोगी ठरणारा हाच नाला रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे. फलाट क्रमांक १ ला लागून असलेल्या या नाल्याजवळच सी अॅण्ड डब्ल्यू रोलिंग इन एक्जामिनेशन पॉइंट आहे. त्याजवळच आज सकाळच्या सुमारास मोठा खड्डा पडला. सकाळी ९ च्या सुमारास याच ट्रॅकवरून दक्षिण एक्स्प्रेस धडधडत जात होती. वेगात असल्याने एसएलआर डबा उसळला. या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. गांभीर्य लक्षात घेत तातडीने दुरुस्तीकार्य सुरू करण्यात आले. आवश्यक कामे गतीने उरकण्यात आली. पण, ही डागडुजी जुजबी स्वरूपाची असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. यामुळे वेळीच कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पडलेला खड्डा, त्यावरून डबा उसळला, त्यानंतर दुरुस्तीकार्य आटोपण्यात आले. पण, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com