esakal | अहो आश्‍चर्यम! चार वर्षांपासून यंत्र निव्वळ शोभेचेच

बोलून बातमी शोधा

afrecis

रक्तदात्याकडून केवळ प्लेटलेट प्राप्त होतात. या यंत्राद्वारे रक्तदात्यास जोडले जाते आणि प्लेटलेट किटमध्ये फक्त प्लेटलेट जमा केले जातात. बाकीचे रक्त रक्तदात्याच्या शरीरात परत जाते. या अत्याधुनिक प्रक्रियेस 40 ते 60 मिनिटे लागतात. ही प्रक्रिया इतकी सुरक्षित आहे की, रक्तदात्याच्या आरोग्यावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. निरोगी व्यक्ती पुन्हा 48 तासांनंतर प्लेटलेट दान करू शकते.

अहो आश्‍चर्यम! चार वर्षांपासून यंत्र निव्वळ शोभेचेच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलच्या रक्तपेढीत दात्याच्या रक्तातून प्लेटलेट वेगळे करण्यासाठी उपयुक्त ठरणारे एफेरेसिस यंत्र लावण्यात आले आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येत असल्यामुळे सर्वत्र स्वागत करण्यात आले. मात्र, चार वर्षांत कोणत्याही रुग्णाला या प्रक्रियेद्वारे प्लेटलेट उपलब्ध करून दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, राज्य शासनाने 15 लाख रुपये खर्च करून उपलब्ध करून दिलेल्या या यंत्राच्या वापराला अन्न व औषध विभागाची परवानगी मिळाली आहे. यानंतरही केवळ शोभेची वस्तू म्हणून एफेरेसिस यंत्र रक्तपेढीत उभे दिसते.

सविस्तर वाचा - ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन...

या यंत्राद्वारे रक्तदात्याकडून केवळ प्लेटलेट प्राप्त होतात. या यंत्राद्वारे रक्तदात्यास जोडले जाते आणि प्लेटलेट किटमध्ये फक्त प्लेटलेट जमा केले जातात. बाकीचे रक्त रक्तदात्याच्या शरीरात परत जाते. या अत्याधुनिक प्रक्रियेस 40 ते 60 मिनिटे लागतात. ही प्रक्रिया इतकी सुरक्षित आहे की, रक्तदात्याच्या आरोग्यावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. निरोगी व्यक्ती पुन्हा 48 तासांनंतर प्लेटलेट दान करू शकते. महिन्यातून चार वेळा आणि वर्षातून 24 वेळा एखादी व्यक्ती कोणतीही हानी न करता प्लेटलेट दान करून 24 लोकांचे प्राण वाचवू शकते. 2015-16 मध्ये हे यंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) पॅथॉलॉजी विभागात दाखल झाले. या यंत्रासाठी आवश्‍यक बांधकाम करण्यात आले. मात्र, या यंत्राचा एकदाही वापर करण्यात आला नसल्याने ते अद्याप पडून आहे. काही महिन्यांपूर्वी अन्न व औषधी द्रव्ये विभागाच्या पथकाच्या मुंबई आणि नागपूरच्या पथकाकडून रक्तपेढीत हे यंत्र सुरू करण्यासंदर्भात निरीक्षण झाले. परवाना मिळाला असल्याची माहिती मिळाली. किडनीग्रस्त रुग्ण, कर्करोग, डेंगी तसेच व्हायरल फिव्हरसह इतर रुग्णांसाठी हे यंत्र वरदान ठरणार आहे. मात्र, यंत्र सुरू न झाल्याने रुग्ण लाभापासून वंचित आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

वय 18 पेक्षा अधिक असावे
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला दाता एफेरेसिसद्वारे प्लेटलेट देऊ शकतो. दात्याचे वजन किमान 50 किलो असावे. मागील दोन वर्षांत रक्तदान केले पाहिजे. मागील रक्तदानास चांगला रक्तप्रवाह झाला असेल आणि रक्तदात्यास कोणताही आजार नसेल तरच रक्तातील प्लेटलेट दाता या यंत्राद्वारे प्लेटलेट दान करू शकतो. एफेरेसिसद्वारे रक्त देण्याची पद्धत सामान्य रक्तदानासारखीच आहे. यंत्रात असलेल्या निर्जंतुकीकरण, डिस्पोजेबल किटद्वारे हाताने रक्त काढले जाते. या मशीनला सेल-सेपरेटर असे म्हणतात. सेल-सेपरेटरने सेंट्रीफ्यूज नावाची दुसरे मशीन वापरून रक्तामधून आवश्‍यक घटक काढले जातात. उर्वरित रक्तदात्यास त्याच सुईचा वापर करून परत केले जाते.