
नागपूर : बॅक वॉटरचा अनुभव घेण्यासाठी आता केरळ अथवा कोकणात जाण्याची गरज नाही. लवकरच वाघांसह जैवविविधतेने संपन्न पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलीतमारा येथील लोअर पेंच प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये २६ किलोमीटरची बोटिंग सफारी ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.