'CoWin'वरील अपॉईंटमेंट केवळ नावालाच, केंद्रावर गेल्यानंतरही मिळत नाही लस

लसीकरण
लसीकरण e sakal
Updated on

नागपूर : महामारीमुळे (pandemic) आरोग्यव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले. शासकीय रुग्णालयांवर प्रचंड ताण आल्याने गोंधळाची स्थिती आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधित रुग्णांची भर पडत असताना बेड (beds), ऑक्‍सिजन (oxygen), व्हेंटिलेटर (ventilator), रेमडेसिव्हिरचा (remdesivir) तुटवडा तर आहेच पण औषधांचा काळाबाजारही तेजीत आहे. कोरोना महामारी (coronavirus pandemic) नियंत्रणात आणण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा (vaccination) कार्यक्रम जाहीर केला. गोंधळ होऊ नये म्हणून कोविन संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करणे सुरू आहे. पण ज्या तारखेला आणि वेळेला नागरिक लसीकरण केंद्रावर जातात तेव्हा मनःस्तापाशिवाय काहीच हाती लागत नाही. एक तर लस उपलब्ध नसते किंवा दिलेल्या वेळेचे नियोजन नसल्याने नागरिकांना दिवसभर उभे राहावे लागत आहे. (people not getting vaccine even after appoinment in cowin application)

लसीकरण
डॉक्टर मुलीने फोनवर केले मार्गदर्शन अन् अख्खं कुटुंब झाले कोरोनामुक्त

कोविन संकेतस्थळावर १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले. या संकेतस्थळावर नोंदणी करताना अनेकदा सर्व्हर डाऊन असते. त्यामुळे नोंदणीच होत नाही. महत्प्रयासाने नोंदणी झाल्यानंतर नागरिकांना केंद्राचे नाव व वेळ दिली जाते. मात्र, अनेकदा ते केंद्रच बंद असल्याचे आढळून आले. केंद्रावर चौकशीसाठीही कुणी कर्मचारी नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर तेथूनही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा संकेतस्थळावर नोंदणीदरम्यान सांगण्यात आलेल्या केंद्राऐवजी दुसऱ्याच केंद्रावर जाऊन लस घेण्यास अधिकारी सांगत आहेत. यासाठी नोंदणी विसरा अन आधारकार्ड दाखवा व लस घेण्याची सूचना केली जाते. त्यामुळे संकेतस्थळावर नोंदणी फार्स ठरत असल्याचे चित्र आहे.

लस न घेताच लसीकरण झाल्याची नोंद -

लसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतर त्याबाबत नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु, लसीकरण केंद्रावर केवळ नाव नोंदविल्यानंतर लसीकरण झाल्याचे मेसेज आल्याचे एका नागरिकाने सांगितले. परंतु लसीकरणाची वेळ येईपर्यंत लस संपल्याने घेता आली नाही. असे अनेक नागरिक असून त्यांचे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

लसीकरण
श्रीनिवास रेड्डीची उच्च न्यायालयात धाव; राज्य शासनाला नोटीस

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आज बंद

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आज शनिवारी होणार नाही. लसीचा पुरवठा न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा मुबलक पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी 6 केंद्रातून लसीकरण सुरू राहणार आहे.

आतापर्यंतचे लसीकरण

  • एकूण लसीकरण : ५ लाख ५१ हजार ७००

  • पहिला डोस घेणारे नागरिक : ४ लाख ४१ हजार १५६

  • दोन्ही डोस घेणारे नागरिक : १ लाख १० हजार ५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com