Maharashtra Politics : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने उत्तर सादर करण्यासाठी २० जूनपर्यंत मुदत दिली आहे.
नागपूर : काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. या प्रकरणात भारतीय निवडणूक आयोगाने प्रतिवादी म्हणून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.