Petrol-Diesel Price : कर कमी करण्यासाठी नागपुरात आंदोलन; बावनकुळे म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

Petrol-Diesel Price : कर कमी करण्यासाठी नागपुरात आंदोलन

नागपूर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले आहे. यामुळे दरात किंचित का होईना कमी झाली आहे. यानंतर अनेक राज्य सरकारने दर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, महाराष्ट्राची सरकार दर कमी करत नाही आहे. याविरोधात नागपुरात शुक्रवारी भारतीय युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन जोरदार आंदोलन करण्यात आहे.

सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांची कंबर तुटली आहे. गृहिणींचे बजेट चांगलेच बिघडले आहे. यामुळेच की काय केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर पाच रुपयांनी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाले.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत जवळपास १२ ते १५ राज्य सरकारनेही दर कमी करून नागरिकांना दिलासा दिला. यामध्ये भाजप शासीत सरकारसोबत अन्य सरकारचाही समावेश आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप कर कमी केलेले नाही. यामुळे नागरिक व विरोधी पक्षातील नेते दर कमी कधी होणार याची वाट पाहत आहे.

अशात शुक्रवारी नागपुरात भारतीय युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. दर कमी करण्यासाठी राज्य सरकारविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील दर कधी कमी करतात हेच आता पाहणे बाकी आहे.

महाराष्ट्रात दर १२ ते १५ रुपयांनी जास्त

केंद्र सरकारने कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने कर कमी करायला पाहिजे होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून अद्याप कर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर अनेक राज्यातील सरकारने दर कमी केले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र, राज्य सरकार दर कमी करायला तयार नाही. राज्यात पेट्रोल आणि डिझेल १२ ते १५ रुपयांनी महाग विकले जात आहे, असे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

loading image
go to top