मंत्रालयात बॉम्ब असल्याचा कॉल आणि नागपुरात धडपड; प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा कॉल आणि नागपुरात धडपड; प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

नागपूर : मुंबई मंत्रालयात रविवारी दुपारी १२.४० वाजता एकाने फोन करून बॉम्ब (bomb) असल्याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी लगेच मंत्रालयात चाचपणी (Testing in the Ministry) केली. कॉल नागपुरातून केल्याचे लक्षात येताच नागपूर ग्रामीण पोलिस आणि दहशतवाद विरोध पथक (एटीएस) यांनी लगेच धडपड सुरू केली. (Phone Call from Nagpur to have a bomb in Mantralaya)

जवळपास ४० पोलिसांचे पथक दोन तास सर्चिंग करीत होते. शेवटी फेक कॉल करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले. त्याने फेक कॉल केल्याची कबुली दिली. सागर काशिनाथ मेंदरे (उमरेड) असे त्या युवकाचे नाव असून त्याची मकरधोकडा येथील ७ एकर जमीन त्याने विकली. काही जमीन वेकोलिने अधिग्रहित केली होती.

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा कॉल आणि नागपुरात धडपड; प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
मटण पार्टीसाठी चोरला चक्क बकरा; बकरीमालकावर केला चाकूने हल्ला

२० आर जमिनीचा परतावा मिळाला नसल्याने तो १९९७ पासून पत्रव्यवहार करीत होता. मात्र, कुणीही त्याच्या तक्रारीला दाद देत नव्हते. त्यामुळे त्याने प्रशासनाचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी फेक कॉल केल्याचे म्हटले. एटीएसने सागरला ताब्यात घेऊन उमरेड पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीसुद्धा सागरने असाच फेक कॉल केला होता, तेव्हाही एटीएसने त्याला अटक केली होती.

(Phone Call from Nagpur to have a bomb in Mantralaya)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com