

Phule Family Descendants Visit Savitribai Statue Site in Yavatmal
Sakal
यवतमाळ : महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा अपमान झाला, त्या ठिकाणी आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली. मात्र, आता संयम सुटला आहे. परवानगी असतानाही बसविलेला पुतळा हटविणे चुकीचे आहे. दोन दिवसात पुतळा न बसविल्यास याच ठिकाणी उपोषणाचा इशारा महात्मा फुले यांच्या वशंज नीता होले यांनी दिला.त्यांनी मंगळवारी (ता. सहा) स्टेट बँक चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळास्थळाला भेट दिली.