बेला : उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यामुळे मनात राग धरून आरोपीने पोपटलाल डवरे(वय52, केसलापार) यांच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. सुमारे अठरा तास घटनास्थळी निपचीत पडलेल्या डवरे यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे.
उसनवारी घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे पोपटराव डवरे हे वारंवार पैशांकरीता तगादा लावत होते. वारंवार घरी येवून चारचौघात अपमान करीत होते. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांना जिवानिशी ठार मारण्याचा कट रचण्यात आला. त्याकरीता अनिल गायकवाड व वैभव उर्फ गोल्डी नारनवरे (डोंगर्ला, ता.तुमसर, जिल्हा भंडारा) या दोघांच्या मदतीने देशीकट्टा जमवून मंगळवारी (ता.25)फोन करून डवरे यांना बोलावून घेतले व वचपा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.