
PM Modi: मेट्रो प्रवासात तिकीट खरेदी अन् विद्यार्थ्यांशी संवाद; यापूर्वीही मोदींनी असं केलंय, जाणून घ्या कारण?
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध प्रकल्पांसह समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये नागपूरमधील मेट्रोच्या फेज वनचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी स्वतः तिकीट काढून प्रवास केला तसेच मेट्रोमध्ये काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (PM Modi at Nagpur He purchased ticket and interaction with students on metro)
पण पंतप्रधान मोदींची ही कृती एक संदेश देऊन जाते. यापूर्वीही पंतप्रधानांनी विविध शहरांमध्ये मेट्रोचं उद्घाटनं केलं आहे. यावेळीही त्यांनी अशाच प्रकारे मेट्रोच्या तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढलं आणि पुढे मेट्रोतून प्रवास करत उद्घाटनं केलं. यावेळी मेट्रो प्रवासात त्यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील असतात त्यांच्या पंतप्रधान संवाद साधतात.
हेही वाचा: PM मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात कोणकोणत्या महत्वाच्या प्रकल्पांचं होणार लोकार्पण?
आज नागपूरमध्ये फ्रीडम पार्क ते खापरी या मार्गावर पंतप्रधानांनी मेट्रेतून प्रवास केला. यावेळी त्यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवर तिकीट खरेदी केलं आणि पुढे प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यापूर्वी पुण्यातही फेज वन मेट्रोच्या नवाज ते गरवारे कॉलेज पर्यंतच्या मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्षभरापूर्वी उद्घाटनं झालं होतं. यावेळी देखील त्यांनी स्वतः तिकीट काढून पुणे मेट्रोतून प्रवास केला होता. तसेच यावेळीही मेट्रोतून त्यांनी पुण्यातील काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता.
हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
मोदी असं का करतात?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आपल्या सर्वांसाठी आहे. त्यामुळं यातून फुकटात प्रवास करु नये तिकीट काढूनच सर्वांनी प्रवास करायला हवा. याचा ती व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयोग होतो. तसंही विनातिकीट प्रवास करणं हा दंडनीय गुन्हाही ठरतो. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची स्वतः तिकीट काढून प्रवास करणं आपल्याला बरचं काही सांगून जातं. त्याचबरोबर नव्या प्रकल्पाच्या उद्घाटना दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनाही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणं हा त्यांचा उद्देश असतो.