PM Narendra Modi : पंतप्रधानांनी केले नागपूरकर दिव्याचे कौतुक; जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘वर्ल्ड चॅम्पियन’ला हरविले
Divya Deshmukh : लंडनमध्ये विश्वविजेती होऊ यिफानला हरवून नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी अद्वितीय कीर्तिमान घडविला. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर तिलाही तोंड भरून स्तुती केली.
नागपूर : लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक सांघिक गट ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत जगात पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरची ‘गोल्डनगर्ल’ दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.