
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातील १०३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकसित स्वरूपाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी (नागपूर) स्थानकासह शिवनी, डोंगरगड, चांदा फोर्ट आणि आमगाव या पाच स्थानकांचा समावेश आहे.