
नागपूर : नव्या घरात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो गरजूंनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला. घराचे काम सुरू केले. मात्र, लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्याने जिल्ह्यात ६ हजार ६५८ घरकुलांचे काम रखडले आहे. २०१६ पासून घरकुलांचे वेगवेगळ्या कारणांनी कामे थंडबस्त्यात असून अनेकांचे घरकुलाचे स्वप्न धुळीस मिळाले.