PMFME Scheme Faces Bank Hurdles in Nagpur
esakal
नागपूर : केंद्र शासनाच्यावतीने सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्ज देताना बँकांकडून आडकाठी केली जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. गत दहा महिन्यात जिल्ह्यात ४१७ शेतकऱ्यांनी अर्ज केले. यातील ४५ टक्के अर्ज बँकांकडे प्रलंबित असल्याने केंद्राच्या प्रोत्साहन योजनेलाच खीळ बसते आहे.