nagendrakumar bhartiya
sakal
नागपूर
Nagpur Crime : ‘पोक्सो’च्या आरोपीने कोठडीत घेतला गळफास; पोलिस उपनिरीक्षकासह, तीन कर्मचारी निलंबित
पोक्सोच्या प्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
नागपूर - जरीपटका पोलिसांद्वारे पोक्सोच्या प्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागेंद्रकुमार रामजी भारतीया (रा.मदारीपुरा, प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. नागेंद्रकुमार कामगार असून तो कामाचा शोधात नागपुरात आला होता. दरम्यान त्याची मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या एका कामगाराच्या कुटुंबियांशी ओळख झाली.
