Nagpur Crime : अपमानित केल्याने मित्रानेच दिले शितपेयातून विष; उपचारादरम्यान झाला मृत्यू

जिवलग मित्रानेच, शितपेयातून विष दिल्याची धक्कादायक माहिती आली समोर.
Poisoned in cold drinks
Poisoned in cold drinkssakal
Updated on

नागपूर - हुडकेश्‍वर भागातील निलकंठनगरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेच्या तपासात त्याच्या जिवलग मित्रानेच, त्याला शितपेयातून विष दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हुडकेश्‍वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत, मिथिलेश ऊर्फ मंथन राजेंद्र चकोले (वय १९ रा. निलकंठनगर) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत ऊर्फ विजय कालिदास खंडाते (वय १७ रा. नीलकंठनगर) आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांत याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. दोघेही सोबतच दारू प्यायचे.

मिथिलेशची परिस्थिती नसल्याने त्याला वेदांत नेहमीच हिणवत असे. वेदांत सर्व खर्च करायचा. त्याचा मिथिलेशवर रुबाब टाकायचा. त्याला सतत अपमानित करायचा. त्यामुळे मिथिलेश हा संताप यायचा.त्यामुळे त्याला धडा शिकविण्याचे त्याच्या मनात होते. दरम्यान, काही दिवसापूर्वी वेदांतच्या वडिलांनी शेती विकल्याची माहिती मिथिलेश याला मिळाली.

त्याने वेदांतला ठार मारून खंडणी वसूल करण्याचा कट आखला. ८ एप्रिलला हनुमान जयंतीची देणगी द्यायला जायचे असल्याचे सांगून त्याने वेदांतला भेटायला बोलाविले. त्यानंतर दोघेही मिथिलेशच्या मोटारसायकलवर बसले. शितपेयात दारू मिसळली. एका बाटलीत मिथिलेशने दारूसह विषही टाकले. ही बाटली त्याने वेदांत याला प्यायला दिली.

दारू समजून वेदांतने ते प्राशन केले. काही वेळाने वेदांत घरी परतला. त्याला उलटी झाली. त्याच्या आईने विचारणा केली. मिथिलेश याच्यासोबत शीतपेय प्यायल्याचे त्याने आईला सांगितले. वेदांत याला सक्करदऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

१२ एप्रिलला सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com