esakal | बंदोबस्तातील खाकी वर्दीसाठी ते आले घराबाहेर, माणुसकीचा धर्म जिवंत
sakal

बोलून बातमी शोधा

besa.

संचारबंदीदरम्यान रस्त्यावर अनुचित घडू नये, नागरिक रस्त्यांवर निघू नये ही खबरदारी घेण्यासाठी पहाटे पाच वाजता खाकी वर्दी रस्त्यावर आली. प्रत्येक चौकात केवळ खाकी वर्दीतील माणूस दिसत होता. तर काळ्या डांबरी रस्त्यावरून फिरणारी पोलिसांची वाहनं दिसत होती.

बंदोबस्तातील खाकी वर्दीसाठी ते आले घराबाहेर, माणुसकीचा धर्म जिवंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऊन, पाऊस, वादळ असो किंवा एखादा सण असो सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्‍याप्रमाणे खाकी वर्दीतील पोलिस नेहमीच तत्पर असतात. बंदोबस्त हा पोलिसांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. कधीही गरज लागली तरी पोलीस तातडीने मदतीला धावून येतात. पोलिसांच्या या तत्परतेची प्रचिती कोरोनाच्या दहशतीच्या वातावरणात पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. पहाटे 5 वाजतापासून चौका-चौकात पोलीस पथक तैनात होते. उपाशी तापाशी कर्तव्यावरील पोलिसांना चार घास खाऊ घालवे, त्यांची भुक भागवावी या हेतूने भर उन्हात हातात मोठा डबा घेऊन तो निघाला. बेसा चौकात त्याने तैनात खाकी वर्दीतील पोलिसांना पोहे खाऊ घातले. चहा दिला. व्यंकटेश सिटीतील सांरग चव्हाण असे त्यांचे नाव. शहरातील अनेक चौकात असा माणुसकीचा धर्म निभावणारे नजरेला सुखावणारे चित्र दिसले.
उपराजधानीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 31 मार्चपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यात रविवारी जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. अशावेळी संचारबंदीदरम्यान रस्त्यावर अनुचित घडू नये, नागरिक रस्त्यांवर निघू नये ही खबरदारी घेण्यासाठी पहाटे पाच वाजता खाकी वर्दी रस्त्यावर आली. प्रत्येक चौकात केवळ खाकी वर्दीतील माणूस दिसत होता. तर काळ्या डांबरी रस्त्यावरून फिरणारी पोलिसांची वाहनं दिसत होती.

सविस्तर वाचा - रशियाहून आला नि थेट पकडली ट्रेन, नागपूर येताच झाले असे

अशा निमर्नुष्य रस्त्यांवर पोलिस तहान भूक विसरून आपले कर्तव्य सांभाळत होते. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचाही परिवार आहे, परंतु क्षणात येथे तर दुसऱ्या क्षणी दुसरीकडे असे फिरस्ती पोलिस बंदोबस्तात असताना बेसा येथील व्यंकटेश सिटीत वास्तव्याला असणारे सारंग चव्हाण यांनी पोलिसांसाठी पोहे तयार करून आणले. या चौकात तसेच इतरही भागात अनेक ठिकाणी तैनात असलेल्या या पोलिसांना त्यांनी पोहे खाऊ घातले. पोलिसांनीही सांरग चव्हाण यांचे आभार मानले.