esakal | अखेर ‘वॉंटेड’ चेनस्नॅचर गजाआड! चोरीच्या दुचाकीने करायचा चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Beltrodi Police

काळ्या रंगाच्या दुचाकीवर निळसर रंगाचा शर्ट, गळ्यात पंढरा रंगाचा दुपट्टा असलेल्या अनोळखी आरोपीने महिलेच्या गळ्यावर थाप मारुन २३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता.

अखेर ‘वॉंटेड’ चेनस्नॅचर गजाआड! चोरीच्या दुचाकीने करायचा चोरी

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः ‘वॉंटेड’ चेनस्नॅचरला बेलतरोडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने `फिल्मीस्टाईल' पाठलाग करुन अटक केली. त्याच्या ताब्यातून सोन्याची ७५ ग्रॅम लगदी व पाच दुचाकी, मोबाईल व रोख असा एकूण ६ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आकाश फुलचंद इरपाते (३५, रा. रामकृष्णनगर, दिघोरी) असे आरोपीचे नाव आहे.

अनिता ज्ञानेश्वर झाडे (४०) रा. व्हाईट फिल्ड बिल्डींग, जयहिंद सोसायटी, शामनगर, बेलतरोडी असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. अनिता ही ११ ऑगस्टला सायंकाळी मनिषनगर येथील अमृत लॉनजवळ सामान खरेदीसाठी पायी जात होती. दरम्यान काळ्या रंगाच्या दुचाकीवर निळसर रंगाचा शर्ट, गळ्यात पंढरा रंगाचा दुपट्टा असलेल्या अनोळखी आरोपीने महिलेच्या गळ्यावर थाप मारुन २३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांनी सदर घटना गांर्भीयाने घेत तपासाची चक्रे फिरविली. विविध पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस उपायुक्त कार्यालयातील सायबर सेलच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचा छडा लावला. फिल्मीस्टाईल पाठलाग करुन त्यास मोठ्या कुशलतेने अटक करण्यात आली. आरोपी हा चोरीच्या दुचाकीने चेनस्नॅचिंग करायचा आणि त्यानंतर दुचाकी घरी ठेवून दुसऱ्या दुचाकीने फिरायचा. हा चोरटा एका सराफाकरीता काम करायचा. त्याच्याच ताब्यातून चोरीचे सोने पोलिसांनी जप्त केल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे या सोनारालाही लवकर अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत, हवालदार अविनाश ठाकरे, विकास मनपिया, तेजराम देवळे, रणधिर दीक्षित, नायक शिपाई बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख, विजय श्रीवास, प्रशांत सोनुलकर, पोलिस शिपाई कुणाल लांडगे, नितीन बावणे, कमलेश गणेर, राजेंद्र नागपुरे, महिला शिपाई अमिता उईके, सायबर विभागातील पोलिस शिपाई दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक आदींनी केली.

अशी ही बनवाबनवी! कोणी केली व नेमकी कशासाठी? वाचाच

चोरट्यावर १० गुन्हे
शहरातील विविध पोलिस ठाण्यात आरोपी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहेत. नंदनवनमध्ये ५ गुन्हे, हुडकेश्वर व लकडगंजमध्ये ४ गुन्हे, १ बॅग लिफ्टींग असे १० गुन्हे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करुन २६ पर्यत पोलिस कोठडी प्राप्त केली.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top