धक्कादायक! नागपुरात नॅचरोपॅथीच्या डॉक्टरचा कोव्हिड रुग्णांवर उपचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धक्कादायक! नागपुरात नॅचरोपॅथीच्या डॉक्टरचा कोव्हिड रुग्णांवर उपचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
PASIEKA

नागपूर : नॅचरोपॅथीचा (Naturopathy) डॉक्टर चक्क कोरानाबाधितांवर उपचार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव नवीन कामठी पोलिसांनी उघडकीस आणले. पोलिसांनी कामठीतील (Kamtee police) सैलाबनगर येथे सुरू असलेल्या धमार्थ दवानाखान्यात छापा टाकला. पोलिसांनी डॉक्टरला अटक करून ऑक्सिजन सिलेंडर, करोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या औषधांसह अन्य औषधांचा साठा जप्त केला. चंदन नरेश चौधरी (वय ४५ रा. सैलाबनगर)असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.(police arrested man who illegally treating corona patients)

धक्कादायक! नागपुरात नॅचरोपॅथीच्या डॉक्टरचा कोव्हिड रुग्णांवर उपचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

चंदन हा नॅचरोपॅथीचा डॉक्टर आहे. गत दहा वर्षांपासून तो सैलाबनगरमध्ये धमार्थ दवाखाना चालवित आहे. चंदन हा विना परवानी तसेच अधिकार नसतानाही करोनाबाधितांवर उपचार करीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना मिळाली.

निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय मालचे, पोलिस निरीक्षक विजय काळे , सहाय्यक उपनिरीक्षक कन्नाने, नायब तहसीलदार दुसावार, उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉ. शबनम खानोनी यांनी गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दवाखान्यात छापा टाकला. त्याला उपचाराबाबतचे दस्तएवेज मागितले. त्याच्याकडे केवळ नॅचरोपॅथीचा परवाना होता.

धक्कादायक! नागपुरात नॅचरोपॅथीच्या डॉक्टरचा कोव्हिड रुग्णांवर उपचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गडचिरोलीत अवैध दारूचा महापूर; लांझेडामधील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

तो करोनाबाधितांवर उपचार करीत असल्याचे तपासणीदरम्यान कळल्याने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी दवाखान्याची झडती घेतली असता यात करोनाबाधितांना देण्यात येणारी स्टेरॉयडची औषधे,अॅलोपॅथीची औषधे मोठ्या प्रमाणात आढळली. पोलिसांनी सर्व औषधे व ऑक्सिजन सिलेंडर जप्त केले. चौधरी याला अटक केली.

(police arrested man who illegally treating corona patients)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com