
नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंतुजीनगरात केबल व्यावसायिक असलेल्या अमोल कृष्णा वंजारी याचा कुख्यात गुंड जब्बार आणि त्याच्या साथीदारांनी खून केला. अमोलही गुन्हेगारीत सक्रीय असल्याने त्याच्या खुनामागे नेमका कोण? याचा शोध आता वाठोडा पोलिस घेत आहेत.