Nagpur Voilence : पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू; अनेकांची धरपकड, पोलिसांकडून बळाचा वापर

मध्य नागपुरातील महाल आणि परिसरात सुरू झालेल्या दंगलीला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Nagpur Voilence
Nagpur Voilencesakal
Updated on

नागपूर - मध्य नागपुरातील महाल आणि परिसरात सुरू झालेल्या दंगलीला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान एका समुदायाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये काही पोलिस जखमी झाले. दरम्यान जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी भालदारपुऱ्यात धरपकड सुरू केली. त्यात अनेक युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

महाल, गणेशपेठ आणि गांधीबाग परिसरात काही युवकांनी सायंकाळच्या सुमारास दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही युवकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तणाव वाढला. यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले.

दरम्यान पोलिसांनी जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. काही वेळात पोलिसांनी जमावाला हुसकावून लावले. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी भालदारपुऱ्यातील घराघरात शिरून शेकडो युवकांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांच्या मोठा ताफा होता.

कायदा हातात घेऊ नका - पोलिस आयुक्त

महाल परिसरात झालेल्या दंगलीनंतर पोलिस आयुक्ता डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी कुणीही कायदा हातात घेतल्यास त्याला सोडणार नसल्याचा इशारा दिला. याशिवाय परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com