पोलिसानं भाजीपाला दुकानाची केली नासधुस, कारवाई करण्याचे नितीन राऊतांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

action

Viral Video : पोलिसानं भाजीपाला दुकानाची केली नासधुस, कारवाई करण्याचे नितीन राऊतांचे आदेश

नागपूर : शहरातील मंगळवारी परिसरात (mangalwari area) पोलिसांनी एका भाजीच्या दुकानात नासधुस (misbehave with vegetable vendor) केल्याचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ११ वाजेपर्यंत आम्ही धंदा करायचा नाहीतर मग पोट कसं भरायचं? असा प्रश्न या लहान दुकानधारकांकडून विचारला जात आहे. मात्र, पोलिस ही कारवाई ११ वाजण्याच्या नंतरची असल्याचा दावा करत आहेत. त्यात आता पालकमंत्री नितीन राऊत यांनी या बाबीची गंभीर घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (police misbehave with vegetable vendors in mangalwari area of nagpur)

शहरातील मंगळवारी परिसरात एक महिला भाजी विकत असताना पोलिसाने भाजीपाल्याची नासधूस केली. भाजीने भरलेली पोती रस्त्यावर फेकल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच संबंधिक पोलिसाविरोधात योग्य ती कारवाई करून त्या महिलेला तिचे नुकसान भरपाईचे पैसे भरून देण्याचे आदेश राऊत यांनी नागपूर पोलिसांना दिले आहे. यासंबंधित ट्विट करून त्यांनी स्वतः माहिती दिली.

दरम्यान, ही कारवाई करणाऱ्या पोलिसाविरोधात कारवाईचा निषेध करत असून त्याच्याविरोधात लवकरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top