sneha chaturvedi
sakal
नागपूर - ‘नीट’ पेपरफुटीमुळे तणावात आलेल्या स्नेहा चतुर्वेदी हिने २० मे रोजी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स पोस्ट’ केल्यावर एकच खळबळ उडाली. मात्र, याप्रकरणी आत्महत्येनंतरही बारा दिवस घटनास्थळी सापडलेली सुसाईड नोट रेकॉर्डवर न घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेड कॉन्स्टेबलची चौकशी सुरू करण्यात आली आहे.