
नागपूर : ऑर्केस्ट्रॉची परवानगी घेत डान्सबार सुरू करणाऱ्या एमआयडीसी परिसरातील ‘एस’ बारवर पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या पथकासह ठाण्यातील पथकाने रविवारी (ता.८) मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास छापा टाकला. एमआयडीसी पोलिसांनी बारमालक, व्यवस्थापक, रोखपालासह २१ जणांना ताब्यात घेतले.