esakal | ‘चल ऑटोमध्ये फिरून येऊ’ असे म्हणत केले अपहरण; पैसे मिळणार नसल्याचे बघून मावशीच्या घराजवळ दिले सोडून
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnappers of police boy arrested

सीसीटीव्ही फुटेज आणि मुलाने केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुलतान खानला हुडकून काढले. त्याला सायंकाळी अटक केली. त्याने वाढत्या कर्जातून मुक्ती मिळविण्यासाठी अपहरण आणि खंडणीची योजना आखल्याची कबुली दिली. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

‘चल ऑटोमध्ये फिरून येऊ’ असे म्हणत केले अपहरण; पैसे मिळणार नसल्याचे बघून मावशीच्या घराजवळ दिले सोडून

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पोलिस कर्मचाऱ्याच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून १० लाखांची खंडणी मागणारा अपहरणकर्त्याला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी मुलाचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याची कबुली आरोपीने दिली. सुलतान खान (रा. बोरगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले कमलेश जावडीकर यांचा १२ वर्षीय मुलगा सार्थक याचे शुक्रवारी दुपारी दीड वाजता अपहरण झाले होते. अपहरणकर्त्याने १० लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली होती.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा

सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अपहृत मुलगा सार्थक थेट मावशीच्या घराजवळ आढळून आला होता. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पीआय सुनील चव्हाण आणि पीएसआय साजीद अहमद यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

सीसीटीव्ही फुटेज आणि मुलाने केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुलतान खानला हुडकून काढले. त्याला सायंकाळी अटक केली. त्याने वाढत्या कर्जातून मुक्ती मिळविण्यासाठी अपहरण आणि खंडणीची योजना आखल्याची कबुली दिली. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जाणून घ्या - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा

ऑटोने केले अपहरण

आरोपी सुलतान हा भाजीविक्रेता आहे. त्याच्यावर जवळपास तीन ते चार लाखांचे कर्ज आहे. कर्ज देणारे त्याला त्रस्त करीत होते. त्यामुळे त्याने मोठा हात मारण्याचे ठरविले. त्याला कमलेश जावडीकर आणि मुलगा सार्थक दोघेही ओळखतात. कमलेश यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचे सुलतानच्या लक्षात आले. त्याने मैदानावर खेळत असलेल्या सार्थकला फिरून येऊ, असे बोलून आटोत बसण्यास सांगितले. त्याने शहरात फिरवतानाच १० लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर सहा लाखांवर आला. शेवटी त्याला पैसे न मिळाल्यामुळे सार्थकला त्याच्या मावशीच्या घराजवळ सोडले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top