Nagpur News : दीक्षाभूमीला पोलिसांचा वेढा

दीक्षाभूमीवरील अनुयायांनी पार्किंगचे काम बंद पाडण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Dikshabhu Police Bandobast
Dikshabhu Police Bandobastsakal
Updated on

नागपूर - दीक्षाभूमीवरील अनुयायांनी पार्किंगचे काम बंद पाडण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. एसआरपीएफ आणि चारशे अधिकारी-कर्मचारी तैनात केले गेले आहेत.

दीक्षाभूमीवर दुपारी पोलिसांचा ताफा दाखल झाला. पाचही झोनचे पोलिस उपायुक्तांसह विविध शाखेचे उपायुक्त, साहाय्यक पोलिस आयुक्तांसह पोलिस निरीक्षक आणि अधिकारी कर्मचारी पोहोचले.

यावेळी जमावाला शांत करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, आंदोलन शांत झाल्यावर रात्री जेसीबी लावून बांधकामाचा गड्डा बुजविण्याचा इशारा नागरिकांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त लावला आहे. विशेष म्हणजे, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी मागविण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनात झालेल्या प्रकाराची तपासणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कुणीही कायदा हाती घेऊ नये - पोलिस आयुक्त

आंदोलकांनी कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहचेल असे कृत्य न करता कायदा हाती न घेण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून बांधकामाला स्थगिती दिली असल्याने आंदोलकांनी संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com