
नागपूर : हनी ट्रॅपमुळे राजकारणात चांगलीत खळबळ उडाली असताना आता भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल तर सीडी ओपन करा, असे चॅलेंज विरोधकांना केले. यावर माध्यमांशी बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून ‘बाबू धीरज रखो जरा, सब ओपन हो जायेगा’ असा इशारा दिला.