

Power Play in Yavatmal Municipality Sparks Debate Within Shinde Sena
sakal
यवतमाळ: काही पालिकेत शिंदेसेना बहुमतात असली तरी काही ठिकाणी युती करावी लागणार आहे. याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. पाच) दहा पालिकेतील नगरसेवकांना यवतमाळात बोलविण्यात आले होते. या बैठकीत यवतमाळसह इतर पालिकेतील गटनेता निवडीवर चर्चा झाली. मंगळवारी (ता. सहा) प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे.