Bacchu Kadu
sakal
नागपूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून सातत्याने केवळ आश्वासने दिली जात होती. सात-बारा कोरा करू, योग्यवेळी कर्जमाफी देऊ, अशी बोळवण केली जात होती. मात्र, आम्ही सरकारचे नाक दाबले, त्यामुळे त्यांना तोंड उघडावे लागले आणि कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली, असा दावा प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे केला.