esakal | विदर्भात हवामान बदलाचा डबल वार; एकीकडे उन्हाचे चटके तर शुक्रवारनंतर वादळी पावसाची शक्यता 

बोलून बातमी शोधा

possibility of stormy rain after friday in vidarbha region

वर्धा (४२.४ अंश सेल्सिअस) आणि ब्रम्हपुरी (४२.४ अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे तीव्र चटके जाणवले. विदर्भात उन्हाची लाट आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे. 

विदर्भात हवामान बदलाचा डबल वार; एकीकडे उन्हाचे चटके तर शुक्रवारनंतर वादळी पावसाची शक्यता 
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चढल्याने उकाडा जाणवू लागला आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना शुक्रवारनंतर विदर्भात वादळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

'पदवीधर निवडणूक गमावलीत आता महापालिका गमावू नका"; नितीन गडकरींचं स्थानिक...

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, नागपूरच्या कमाल तापमानात चोविस तासांत एका अंशांची वाढ होऊन पारा पुन्हा ४२ अंशांवर गेला. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अपेक्षेप्रमाणे चंद्रपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.

वर्धा (४२.४ अंश सेल्सिअस) आणि ब्रम्हपुरी (४२.४ अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे तीव्र चटके जाणवले. विदर्भात उन्हाची लाट आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे. 

उपराजधानीत लसीकरण जोमात! नवीन ५१ लसीकरण केंद्र लवकरच...

वेस्टर्न डिस्टर्बन्स'च्या प्रभावामुळे शुक्रवारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही दाट शक्यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ