काय चाललंय हे... महिनाभरापासून विद्यापीठात प्र-कुलगुरू नाही, यांचे पदही आहे रिक्त

post of Vice-Chancellor, Dean has been vacant for a month in University
post of Vice-Chancellor, Dean has been vacant for a month in University

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सध्या प्र-कुलगुरू आणि अधिष्ठातांची पदे एक महिन्यापासून रिक्त असल्याने परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय निकाल लावण्यासाठी अधिष्ठात्यांची समिती असते. मात्र, सध्या प्र-कुलगुरू आणि अधिष्ठातांची पदे असल्याने एखादी समस्या आल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

डॉ. सिद्धार्थविनायक काणे ८ एप्रिलला निवृत्ती झाल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि चारही अधिष्ठातांच्या पदाचा कार्यकाळ संपला. ८ ऑगस्टला नव्या कुलगुरूंनी पदाची सूत्रे स्वीकारली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येण्याचे ठरले आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या विविध सत्रांचे निकाल रखडले आहेत.

निकाल लावताना त्यात झालेल्या चुका आणि आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील चार अधिष्ठातांचा समावेश असलेली समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच ‘बोर्ड ऑफ डीन्स'द्वारे अभ्यासक्रम तयार करणे, पेपर सेट करणे आणि इतर कामे केली जातात. 

सध्या एकाही अधिष्ठात्याची नेमणूक झालेली नसल्याने अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाचे पेपर कसे तयार करायचे हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय निकाल लावण्याची कामे खोळंबली आहेत. परीक्षेच्या सर्व समित्यांचे अध्यक्ष प्र-कुलगुरू असतात. आता हेच पद रिक्त आहे. परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा मंडळ आणि विद्वत परिषदेची बैठक घेणे आवश्यक आहे.

एकही जाहिरात नाही

विद्यापीठ कायद्यानुसार पूर्णवेळ अधिष्ठात्यांची निवड करण्यासाठी जाहिरात आवश्यक असते. या प्रक्रियेतून अर्ज आल्यानंतर त्यापैकी शाखानिहाय अधिष्ठात्यांची निवड करण्यात येते. मात्र, विद्यापीठाने एकदाही या पदाच्या निवडीसाठी जाहिरात दिली नाही. केवळ कुलगुरू यांच्याद्वारेच निवड करण्यात आली आहे. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com