
दिग्रस : शहरातील विद्युत व्यवस्थेचे सध्या तीनतेरा वाजले आहेत. महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभाराने कधी एक तर कधी चार, तर कधी दिवसभर व कधी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने दिग्रसकर वैतागले आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने प्रभारींवर व्यवस्था आहे. तक्रारीचा वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तिळमात्र फरक पडत नसल्याचे नागरिक संतापून सांगतात.