नागपूर : वादळी पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. सावरकरनगर आणि हिंदुस्तान कॉलनी येथील वीज वाहिन्यांवर झाडे कोसळून वीजतारा तुटल्या. त्यामुळे लगतच्या वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. .नागलवाडी, नारायणनगर, धरमपेठ, एमएम टॉवर, व्यंकटेशनगर वीजवाहिन्यांवरून होणारा वीजपुरवठाही खंडित झाला. सोबतच करण लॉनजवळील अंकिता सोसायटी येथे वीज वाहिनी तुटली. सीपीडब्ल्यू कॉलनी, गिट्टीखदान, पोलिस लाईन, आझादनगर, नेहरू कॉलनी, पेन्शननगर, बाबा फरीदनगर, रतननगर, गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी, शंभूनगर, ओमनगर, प्रेमनगर शिवागी, फ्रेंड्स कॉलनी, क्लार्क टाऊन २, मनोरूग्णालय, किंग्सवे हॉस्पिटल भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक व्होल्टेज वाढल्यामुळे बहादूरा, पवनपुत्रनगर येथील नागरिकांचे टीव्ही फ्रीज,वॉटर फिल्टर, पाण्याच्या मशीन, एसी जळाल्याच्या तक्रारी आहेत..खडगाव, वाडीतील वाहिन्या ट्रीपवाडी, हिंगणा विभाग क्रमांक २, लावा, खडगाव आणि महादेवनगर येथील वीज वाहिन्याही पावसामुळे ट्रीप झाल्या. त्यामुळे अनेक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सुराबर्डी उपकेंद्रातील वाहिनी बंद पडल्यामुळे दुसऱ्या उपकेंद्रामधून बॅक फीडद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. .Nagpur Rain : नागपूर शहरात विजांसह दमदार पाऊस; दिवसभर जाणवला उकाडा, पुढचे चार दिवस यलो अलर्ट.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात युद्धपातळीवर काम करत बहुतांश वाहिन्यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू केला. सध्या लघुदाब वाहिन्यांचे काम सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रात्री उशिरा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.